Welcome to Adivasi Vikas Vibhag, Nagpur. We hope you will have good experience

          Marathi
वैयत्त्किक लाभाच्या योजना - शेतकऱ्यांसाठी - एचडीपीई पाईप पुरवठा करणे

आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप/ तेलपंप पुरवठा करणे

योजनेचे स्वरूप

आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी 100 टक्के अनुदानावर वीजपंप मंजूर केले जातात. या योजनेशी संलग्न योजना म्हणून आदिवासी शेतकऱ्यांना पी.व्ही.सी. पाईप पुरवठा करणे ही योजना आदिवासी विकास महामंडळामार्फत राबविल्या जाते.

1. या योजनेअंतर्गत ज्या आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप/तेलपंप मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी दारिद्रयरेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना आता पी.व्ही.सी. पाईप ऐवजी एच.डी.पी.ई. पाईपचा पुरवठा करण्यात येतो. 2. एका लाभार्थ्यास 6 मीटर लांबीचे एच.डी.पी.ई. पाईप, 210 मीटर लांबीचे मर्यादत तसेच रु.15,000/- चे कमाल आर्थिक मर्यादेत असावेत.

• अर्जदाराच्या जमिनीचा खाते उतारा (3 प्रतीत) • ज्या ठिकाणी पी.व्ही.सी. पाईप बसावयाचे आहेत, त्या गट क्रमांक व चतु:सिमा नकाशा (2 प्रतीत) • पाण्याचे साधन नदी/नाला असल्यास, पाणी परवानगी जोडणे (2 प्रतीत) • बी.पी.एल. प्रमाणपत्र

https://www.embeddedcreation.in/adivasi_vikas_pdf/AV3.pdf

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प